सामवेद

सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे ‘गायन’ आणि वेद म्हणजे ‘ज्ञान’ होय.हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, असे मानले जाते..

हिंदू धर्मग्रंथावरीललेखमालेचा भाग
वेद
ऋग्वेद ·यजुर्वेद
सामवेद ·अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता ·ब्राह्मणे
आरण्यके ·उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय ·बृहदारण्यक
ईश ·तैत्तरिय ·छांदोग्य
केन ·मुंडक
मांडुक्य ·प्रश्न
श्वेतश्वतर ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा ·छंद
व्याकरण ·निरुक्त
ज्योतिष ·कल्प
महाकाव्य
रामायण ·महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती ·पुराणे
भगवद्गीता ·ज्ञानेश्वरी ·गीताई
पंचतंत्र ·तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक ·रामचरितमानस
शिक्षापत्री ·वचनामृत

. . . सामवेद . . .

ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.त्यांच्यापैकी एक म्हणजे सामवेद.

साम शब्दाचा पहिला अर्थ प्रिय किंवा प्रियकर वचन असा आहे. कुठे कुठे गान या अर्थानेही तो प्रयुक्त आहे. प्रचलित सामवेदाला हाच अर्थ लागू पडतो. सा च अमश्चेति तत् साम्न: सामत्वम्‌। (बृहदारण्यक उपनिषद १.३.२२) सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे गांधारादी स्वर होत. दोन्ही मिळून साम होते.

सामवेदात ॠग्वेदातील ॠचांचे गायन कसे करावे याचे विवेचन आहे. सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते. यातील ७५ ऋचा ऋग्वेदाच्या शाकल शाखेतून घेतल्या, तर इतर ७५ या बाष्कल शाखेमध्ये मोडतात. या ऋचांचे गायन-सामगान हे सुचवलेल्या विशिष्ट सुरांमध्ये गायले जाते. सामगान गाऊन विशिष्ट विधी करतांना विविध देवतांना प्रसाद पेयार्पण म्हणून दूध व इतर पदार्थाबरोबर सोम वनस्पतीचा रस अर्पिला जाई.

सामवेदातील काही ऋचा या इ.स.पू. १७०० च्या आधी (ऋग्वेदाच्या कालखंडात) रचल्या असल्या पाहिजेत असे मानले जाते. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने वेदानां अहम् सामवेदोस्मि असे म्हटले आहे, हा सामवेदाचा गौरवच आहे. कौथुम आणि राणायनीय, जैमिनीय या सामवेदाच्या शाखा मानल्या जातात. ताण्ड्य/पञ्चविंश, षड्विंश, साम विधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद् आणि वंश ही सामवेदाची ब्राह्मणे आहेत.

गंधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद आहे.

वेदा हि यज्ञार्थ अभिप्रवृत्ता:| वेद हे यज्ञासाठीच प्रवृत्त झाले आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. यज्ञातील वेगवेगळी कर्मे करणारे ऋत्विज वेगवेगळे असतात. त्यांना विशिष्ट नावे असतात. देवतांना संतुष्ट करण्यासाठी ऋचांचे गायन करण्याचे काम सामवेद्यांचे असते. ते करणाऱ्या चार ऋत्विजांचा एक गट असतो.त्यांच्या प्रमुखाला उद्गाता म्हणतात. एखादे साम तयार झाले की त्याच्या गायनाचे पाच अवयव तयार होतात, ते असे :-

१. प्रस्ताव

२. उद्गीथ

३. प्रतिहार

४.उपद्रव

५. निधन

सामगान करताना त्यातील ऋचांची आवृत्ती केली जाते त्याला स्तोम असे म्हणतात. साम हे प्राय: तीन ऋचांवर गायले जाते आणि त्याचे तीन पर्याय म्हणजे तीन आवृत्त्या करतात.

. . . सामवेद . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . सामवेद . . .

Previous post संदेश गुल्हाने
Next post व्हरकटवाडी