व्हरकटवाडी

व्हरकटवाडी हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील गाव आहे.धारूर तालुका हा बालाघाटच्या डोंगर रांगात वसलेला तालुका आहे. तालुक्याच्या खास तीन ओळखी १) दुष्काळी तालुका २) ऊसतोड कामगारांचा तालुका ३) गोड सीताफळांंचा तालुका. व्हरकटवाडी हे असेच एक दुर्लक्षित व मागास वाडी. आपल्या प्रयत्नांनी या छोट्या वाडीने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.[1]

  ?व्हरकटवाडी
महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर धारूर
जिल्हा बीड
तालुका/के धारुर
लोकसंख्या ६६४ (२०११)
भाषा मराठी
सरपंच
ग्रामपंचायत व्हरकटवाडी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड
• ४३११२८
• MH

  . . . व्हरकटवाडी . . .

  व्हरकटवाडी बीड पासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे.धारूर पासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाचे एकूण क्षेत्र ५४६ हेक्टर. गावात १४७ घरे आहेत. [2] २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ६६४ आहे.त्यातील ३६९ पुरुष आणि ३१५ महिला आहेत.[3]

  २०१४ व २०१५ हे दोन सलग वर्षे बीड जिल्ह्यात दुष्काळ होता.[4][5][6] शेतातील नापिकी,शेतकरीआत्महत्या[7], गुरांच्या दुष्काळी धावण्या व गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँँकर अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच गावांची होती.[8] व्हरकटवाडी कमी पर्जन्यमान असल्याने हे गाव नेहमीच दुष्काळी भागात मोडते.[9] कोरडवाहू शेतीवर उपजीविका होत नसल्याने गावातील लोक ऊसतोडणीसाठी जातात.[10][11][12][13]

  . . . व्हरकटवाडी . . .

  This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

  . . . व्हरकटवाडी . . .

  Previous post सामवेद
  Next post रमेश वांजळे