रमेश वांजळे

रमेश वांजळे (१२ नोव्हेंबर, इ.स. १९६५ – १० जून, इ.स. २०११) हे मराठी राजकारणी होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या उमेदवारीवर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उभे राहून ते इ.स. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींतून विधानसभेवर निवडून गेले होते.

रमेश वांजळे


कार्यकाळ
इ.स. २००९  १० जून, इ.स. २०११
मतदारसंघ खडकवासला

जन्म १२ नोव्हेंबर, इ.स. १९६५
अहिरेगाव, (ता. हवेली), पुणे जिल्हा
मृत्यू १० जून, इ.स. २०११
जहांगीर हॉस्पिटल, पुणे
राजकीय पक्ष मनसे
पत्नी हर्षदा वांजळे
निवास कुदळे पाटील, रेशी डॅशी, भारत सहकारी बॅंगेजवळ, सिंहगड रोड, वडगांव खुर्द, ता. हवेली, जि,. पुणे. (हयात असताना)
व्यवसाय दूधविक्री
धर्म हिंदू धर्म

. . . रमेश वांजळे . . .

रमेश वांजळ्यांनी पुणे जिल्ह्यातीलहवेली तालुक्यातील पंचायत समितीपासून राजकारणास सुरुवात केली. २५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या वांजळे यांनी इ.स. २००२ मध्ये हवेली पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले होते. त्यांच्या पत्नीही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. इ.स. २००२-२००७ या काळात ते हवेली पंचायत समितीचे सदस्य होते; तर त्यापैकी इ.स. २००२-२००४ या कालखंडात हवेली पंचायत समितीचे उपसभापती होते[1]. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री (कै.) रामकृष्ण मोरे यांचे वांजळे निष्ठावंत कार्यकर्ते होते. इ.स. २००९ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. विधानसभेच्या इ.स. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून मनसेची उमेदवारी मिळाली. ऐन वेळी पक्षबदल करूनही ते पहिल्याच प्रयत्नात चांगल्या मताधिक्‍याने विजयी झाले. इ.स. २००९ च्या निवडणुकींनंतर भरलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राची अधिकृत भाषा असलेल्या मराठीऐवजीहिंदीतून आमदारपदाची शपथ घेणार्‍या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांच्यासमोरचा माईक हिसकावून घेतल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते [2].

अंगावरील अडीच किलो सोन्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या वांजळे यांनी अल्पावधीत महाराष्ट्रात आपली प्रतिमा निर्माण केली होती. हवेली तालुक्‍यातील अहिरे गावचे सरपंच ते खडकवासला मतदारसंघाचे आमदार असा राजकीय पल्ला त्यांनी गाठला. अंगावर सोन्याचे भरपूर दागिने घालत असल्याने त्यांचा उल्लेख काही जण गोल्डमॅन असा करत.

१० जून, इ.स. २०११ रोजी हृदयाघाताच्या तीव्र झटक्याने पुण्यात त्यांचे निधन झाले.[3]

. . . रमेश वांजळे . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . रमेश वांजळे . . .

Previous post व्हरकटवाडी
Next post नागरी युद्ध