महाराष्ट्रातील आरक्षण

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी एकूण ५२% आरक्षण दिले आहे. ज्यामध्ये ओबीसींना ३२ टक्के आरक्षण दिले आहे, तर अनुसूचित जातींना १३ टक्के आणि अनुसूचित जमातींना ७ टक्के आरक्षण दिलेले आहे.

आर्थिक दृष्टीने मागासवर्ग १०% EWS आरक्षण आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकीय नोकऱ्यात अनाथ व्यक्तिंसाठी १% आरक्षण लागू केले आहे.

मुस्लिमांमधील ३७ जातींचा ओबीसींमध्ये समावेश आहे.[1]

राज्यघटना तयार होताना संविधान सभेचे सदस्य टी.टी. कृष्णामाचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘मागासवर्ग म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तरदाखल डॉ. आंबेडकर म्हणाले, “अनुसूचित जाती आणि जमातींशिवायअनेक राज्यांत असे घटक आहेत की जे त्यांच्याइतकेच मागासलेले आहेत. मात्र त्यांचा समावेश अनुसूचित जाती – जमातींमध्ये करण्यात आलेला नाही.[2]

. . . महाराष्ट्रातील आरक्षण . . .

महाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय आरक्षण
प्रवर्ग संक्षिप्त नाव आरक्षण जाती लोकसंख्या
अनुसूचित जाती एससी १३% ५९ यादी १,३२,७५,८९८ (११.८१%)
अनुसूचित जमाती एसटी ७% ४७ यादी १,०५,१०,२१३ (९.३५%)
इतर मागास वर्ग ओबीसी १९% ३४६ यादी
विशेष मागास प्रवर्ग एसबीसी २%
विमुक्त जाती – अ व्हीजे – ए ३% १४
भटक्या जाती – ब एनटी – बी २.५% ३७
भटक्या जाती – क एनटी – सी ३.५%

(धनगर)

९%
भटक्या जाती – ड एनटी – डी २%
आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग ईडब्ल्युएस १०%
एकूण ६२%

मराठा विद्यार्थांना ओबीसींच्या धर्तीवर ६०५ अभ्यासक्रमात शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुंबई मराठा महामोर्चाच्या शिष्टमंडळाला या शैक्षणिक सवलती देण्याचे आश्वासन दिले होते. मोर्चाला ४८ तास उलटण्यापूर्वी हे आश्वासन पूर्ण केले गेले.

यापूर्वी मराठा समाजाच्या मुलांना ३५ अभ्यासक्रमात शैक्षणिक शुल्काची सवलत मिळत होती. आता ही मर्यादा वाढविण्यात आली असून, ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे ६०५ अभ्यासक्रमात सवलती मिळत आहेत तसाच लाभ मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे.[3]

याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. यासाठी प्रत्येत जिल्ह्याला ५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली. याचबरोबर मराठा विद्यार्थ्यांना ६ लाखांच्या ईबीसी मार्यादेसाठी ६० टक्के गुणांची अट ५० टक्के करण्यात येणार आहे. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीतून ३ लाख मराठा मुलांना कौशल्य प्रशिक्षण देणार, व त्यातूनच १० लाखांपर्यंतचे कर्जही देण्यात येणार.

. . . महाराष्ट्रातील आरक्षण . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . महाराष्ट्रातील आरक्षण . . .

Previous post शिवथरघळ
Next post दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर