बॅंग-बॅंग क्लब

“बॅंग-बॅंग क्लब” हे एका दक्षिण आफ्रिकेतीलछायाचित्रकारांच्या गटाचे अनौपचारिक नाव होते. हा गट इ.स.१९९० ते १९९४ च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यरत होता. या कालखंडात दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदी धोरणे संपुष्टात आणून कृष्णवर्णीयांना समान मताधिकार मिळवून देण्यासाठीच्या चर्चा सुरू होत्या, [1]. या चळवळीचे समर्थक असलेल्या इंकाथा मुक्ती दल (Inkatha Freedom Party) व आफ्रिकी राष्ट्रीय कॉग्रेस (African National Congress) या दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधीपासूनच सशस्त्र चकमकी घडायला सुरुवात झाली होती [2]. बॅंग-बॅंग क्लबच्या सदस्यांनी याच काळात (इ.स.१९९० ते १९९४) दक्षिण आफ्रिकेतील विविध उपनगरांमधून वृत्तांकणाची व छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली.

या गटामध्ये मुख्यत: “केविन कार्टर“, “ग्रेग मारिनोविच“, “केन ऊस्टरब्रोएक” आणि “होआव सिल्वा” या चार छायाचित्रकार व पत्रकारांचा समवेश केला जातो, तथापि, आणखीही काही पत्रकारांनी तसेच छायाचित्रकारांनी बॅंग-बॅंग क्लब सोबत काम केलेले आहे (ऊदाहणार्थ: जेम्स नाख्टवे आणि गॅरी बर्नार्ड). [3]. बॅंग-बॅंग क्लबच्या कारकिर्दीवर आधारित असलेला याच नावाचा इंग्रजी चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता, स्टीव्हन सिल्व्हर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. [4].

. . . बॅंग-बॅंग क्लब . . .

बॅंग-बॅंग क्लब या नावाचा उगम दक्षिण आफ्रिकेतील “लिव्हिंग आफ्रिका” नावाच्या एका स्थानिक मासिकातील लेखामधून झाला. या लेखामध्ये बॅंग-बॅंग क्लब मधील छायाचित्रकारांचे वर्णन होते, आणि लेखाचे नाव “बॅंग-बॅंग पापारात्सी” असे होते. यातील “बॅंग-बॅंग” हा शब्द बंदूकीचा आवाज दर्शवतो, परंतू “पापारात्सी” (एकवचन: पापारात्सो) या इटालीयन शब्दाचा अर्थ “प्रसिद्ध व्यक्तींचा पाठलाग करून, त्यांची छायाचित्रे काढून विकणारे छायाचित्रकार” असा होतो [5]. या शब्दाला असलेल्या नकारात्मक अर्थामुळे, होआव सिल्वा आणि ग्रेग मारिनोविच यांनी, लिव्हिंग आफ्रिका मासिकाच्या संपादकाला (ख्रीस मॅरीस) विनंती करून तो शब्द बदलण्यास भाग पाडले. आणि शेवटी हा गट “बॅंग-बॅंग क्लब” या नावाने ओळखला जाऊ लागला. [6][3][7].

१८ एप्रिल १९९४ रोजी थोकोझा नावाच्या वस्तीमध्ये, राष्ट्रीय शांती सेना व आफ्रिकी राष्ट्रीय कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोळीबारात ३१ वर्षीय केन ऊस्टरब्रोएक मारले गेले आणि ग्रेग मारिनोविच गंभीर जखमी झाले. केन यांचा मृत्यू शांतीसेनेच्या गोळीमुळेच झाला आहे असे ग्रेग मारिनोविचचे मत होते. केन यांच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे हे शोधण्यासाठी दक्षिण आफ्रिकी सरकारने १९९५ मध्ये एक समिती बसवली, त्या समितीने पुढच्या १५ महिण्यांमध्ये केन यांच्या मृत्यूचा अहवाल न्यायालयासमोर मांडला. या अहवालामध्ये राष्ट्रीय शांती सेनेच्या विरुद्ध पुरावे असूनही न्यायाधिशांनी “कोणालाही दोष देता येणार नाही” असा निकाल दिला [8]. पुढे १९९९ मध्ये ग्रेग मारिनोविच आणि होआव सिल्वा यांची ब्रायन मखीजे नावाच्या राष्ट्रीय शांती सेनेच्या सैनिकाशी भेट झाली, ब्रायन यांच्या म्हणण्यानुसार केन यांचा मृत्यू राष्ट्रीय शांती सेनेच्या गोळीमुळेच झाला [3].

२७ जुलै १९९४ रोजी केविन कार्टन यांनी जोहान्सबर्ग शहराजवळ आत्महत्या केली.

२३ ऑक्टोबर २०१० रोजी अफगाणिस्तानमधल्याकंदहार शहरात झालेल्या भूसुरूंगाच्या स्फोटामध्ये सिल्वा यांनी आपले दोनही पाय गमावले. सिल्वा हे त्यावेळी अमेरिकेच्या सैन्य दलासोबत, अफगाणी युद्धाचे वार्तांकन करत होते. [9].

. . . बॅंग-बॅंग क्लब . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . बॅंग-बॅंग क्लब . . .

Previous post गर्भाधान संस्कार
Next post दिवाळी अंक २०१३