नागरी युद्ध

[1]नागरी युद्ध म्हणजे सिव्हिल वाॅर. नागरी युद्धात एकाच देशातल्या संघटित गटांमध्ये युद्ध होते.[2] उदा० संयुक्त राष्ट्रामधल्या एका देशाचे विभाजन झाल्यावर निर्माण झालेल्या दोन नवीन देशामधले युद्ध..[3] युद्धामधल्या एका पक्षाला मूळ देशावर किंवा देशाच्या काही भागावर नियंत्रण मिळवायचे असते, मूळ देशापासून स्वतंत्र व्हायचे असते किंवा देशाचे धोरण बदलवायचे असते. लॅटिनमध्ये पहिल्या शतकातल्या रोमन कॅथॉलिक गणराज्यात झालेल्या नागरी युद्धाला बेल्लम सिव्हिल असे संबोधिले गेले. असे. त्यावरूनच नागरी युद्ध ह्या संज्ञेची निर्मिती झाली.

नागरी युद्ध मोठे व तीव्र संघर्षाचे असू शकते. ते संघटित असते व दीर्घकाळ चालू शकते. त्यात बऱ्याचदा सैन्याचा वापर होतो, आणि बऱ्याच जणांचा जीव जाऊ शकतो. या युद्धासाठी बरीच साधने व खूप पैसा खर्च होऊ शकतो.[4]

पहिल्या महायुद्धापूर्वीच्या १९०० ते १९४४ काळात नागरी युद्धे सरासरी दीड वर्षे चालत. पण त्यानंतरची नागरी युद्धे चिघळलेली झाली असून त्यांची सरासरी बरीच दीर्घ होऊन ४ वर्षावर जाऊन पोचली आहे. नागरी युद्धांची संख्या दुसऱ्या महायुद्धानंतर कमी झाली असली तरी त्यांच्या दीर्घ काळामुळे एका वेळेस चाललेल्या नागरी युद्धांच्या संख्येत वाढ झाली आहे. उदहरणार्थ, २०व्या शतकाच्या पहिल्या ५० वर्षात एका वेळेस पाचापेक्षा जास्त नागरी युद्धे झाली नाहीत, तेच शीतयुद्धाच्या अखेरीस (१९८० च्या दशकात) तोच आकडा २०च्या पलीकडे जाऊन पोचला होता. १९४५ नंतर झालेल्या नागरी युद्धांत अडीच कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, व त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकांना विस्थपित व्हावे लागले आहे. नागरी युद्धामुळे देश आर्थिक डबघाईला आलेले आहेत. सोमालिया प्रजासत्ताक, ब्रम्हदेश (म्यानमार), युगांडाअंगोला हे देश नागरी युद्धाने पोखरून निघण्याआधी त्यांचे आर्थिक भवितव्य आशेचे आहे असे म्हटले जात असे.[4]

. . . नागरी युद्ध . . .

  1. इंग्रजी विकिपीडियातल्या Civil war ह्या लेखावरून
  2. इराकमधल्या नागरी युद्धावर लेख
  3. [http://eh.net/bookreviews/library/1130अमेरिकेच्यायादवी युद्धावर लेख
  4. Ann Hironaka, Neverending Wars: The International Community, Weak States, and the Perpetuation of Civil War, Harvard University Press: Cambridge, Mass., 2005, p. 3, ISBN 0-674-01532-0

. . . नागरी युद्ध . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . नागरी युद्ध . . .

Previous post रमेश वांजळे
Next post महाराष्ट्रातील राजकारण