दिवाळी अंक २०१३

इ.स. २०१३ च्या दिवाळी काळात सुमारे १२०० अंक सरकारी दप्तरात रजिस्टर झाले आहेत[ संदर्भ हवा ], ४००हून अधिक एवढे दिवाळी अंक प्रकाशित झाले[ संदर्भ हवा ], परंतु दिवाळी संपल्यानंतर केवळ ३०० अंक बाजारात शिल्लक आहेत, असे दैनिक सकाळचे निरीक्षण आहे[ संदर्भ हवा ]. साहित्य, आरोग्य, विनोद, भविष्य, पाककृती, धार्मिक या विषयांचे सर्वाधिक दिवाळी अंक आहेत.

दिवाळी अंक विषयक लेख संपादीत करताना,कृपया, खालील सर्व सूचनांचे आवर्जून पालन करावे
  • सूचना: हा लेख संपादीत करताना,कृपया, खालील सर्व सूचना वाचून घेऊन त्यांचे आवर्जून पालन करावे, आणि चर्चा पानावरील चर्चांचे संदर्भही लक्षात घ्यावेत
  • लेखक/संपादकांनी कृपया खाली लिहीलेल्या सूचनांची दखल घ्यावी हि नम्र सूचना
  1. प्रस्तावित दिवाळी अंका संबधात आवाहने (विकिपीडियावर) मुळीच करू नयेत.
  2. प्रकाशित दिवाळी अंकांची नोंद दिवाळी अंक (यादी) येथे करता येऊ शकते अथवा दिवाळी अंकांचा आढावा दिवाळी अंक २०१२ प्रमाणे वार्षिकी लेख स्वरूपात घेता येऊ शकतो.
  3. प्रकाशित दिवाळी अंका बद्दल मजकुर लिहिताना जाहिरातीचा/प्रसिद्धी प्राप्त करण्याचा उद्देश ठेऊ नये.वाचकांना उद्देशून लिहू नये. स्वतःच्या अथवा आप्त स्नेहींच्या दिवाळी अंकाची माहिती न भरता इतरांच्या दिवाळी अंकाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करावा.(स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. संकेताचे पालन करावे)
  4. लेखांना ज्ञानकोशीय लेखाचे स्वरूप प्राप्त होईल या कडे लक्ष द्यावे , पानांचे स्वरूप शक्यतो केवळ यादीचे रहाणार नाही या कडे लक्ष द्यावे

हा लेख मराठी दिवाळी अंक परंपरा याबद्दल आहे. विकिपीडिया:दिवाळी अंक यासाठी पाहा, दालन:दिवाळी अंक.

. . . दिवाळी अंक २०१३ . . .

दैनिक प्रहारचे लेखक शैलेंद्र शिर्के यांच्या मतानुसार प्रयोगशील अंक आणि नवमाध्यमातील ऑनलाइन अंक, फेसबुकवर अंक, दृक्‌श्राव्य माध्यमात अंक उपलब्ध होत आहेत. कोकणातून, छोटया शहरांमधून, तालुकास्तरावरही काही चांगले अंक सुरू आहेत. पण जुने जाणते, वाचकप्रिय लेखक काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांची जागा घेऊ शकतील असे नव्या जोमाचे, ताकदीचे मराठी लेखक दिसत नाहीत, आणि दिवाळी अंकांचा मूळ गाभा असलेल्या साहित्य, परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी, कमी दिसत आहे. कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते ‘मनावर परिणाम करणार्‍या कसदार साहित्याचा प्रभाव’ हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपयेपर्यंत गेल्या. दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपयांच्या दरम्यान होत्या. तर इ.स.२०१३च्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या. दिवाळी अंकांच्या सर्वसाधारण किमतीत मागील वर्षापेक्षा ३० ते ५० रुपयांची वाढ झाली.

“दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात ’” हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी मुंबई यांचे वृतांकन दिनांक २ नोव्हेंबर २०१३. किमती दोन वर्षांपासून वाढत असल्यातरी २०१३ मधील किंमतवाढ आतापर्यंतच्या दिवाळी अंकांच्या किमतीतील लक्षणीय वाढ आहे. दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्रंथालय सभासदांकडून दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयांना कठीण झाले.

कागदाच्या किंमतीत झालेली ३० टक्के दरवाढ, छपाईच्या दरातील वाढ आणि वाढती महागाई या घटकांचा दिवाळी अंकांच्या किमतीवर परिणाम झाला. अंकाचा विषय/अंकाचे नाव, संपादक, पृष्ठसंख्या आणि किंमत या बाबी विचारात घेऊन वाचक दिवाळी अंकाच्या दर्जाचे अनुमान करतात. त्यासाठी ही माहिती खाली दिली आहे. अंकांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही.

. . . दिवाळी अंक २०१३ . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . दिवाळी अंक २०१३ . . .

Previous post बॅंग-बॅंग क्लब
Next post राष्ट्रीय तपास संस्था