गर्भाधान संस्कार

गर्भाधान हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पहिला संस्कार होय. शौनकाने त्याची व्याख्या अशी दिली आहे-

निषिक्तो यत्प्रयोगेण गर्भ: सन्धार्यते स्त्रिया।

तद् गर्भालम्बनं नाम कर्म प्रोक्तं मनीषिभि:॥

अर्थ- ज्या कर्माच्या पूर्तीने स्त्री पतीद्वारा प्रदत्त अशा गर्भाचे धारण करते त्याला विद्वान लोक गर्भाधान असे म्हणत. म्हणजे योग्य दिवशी, योग्य वेळी, पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मीलन होऊन स्त्रीच्या गर्भाशयात गर्भाची बीज रूपाने स्थापना होणे.

रजोदर्शनापासून १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होऊ शकतो. या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासून पहिल्या चार रात्री वर्ज्य कराव्या.त्या दिवशी अशुभ दिवस, ग्रहणदिवस, कुयोग असू नये. समरात्री संभोग केल्यास पुत्र व विषमरात्री संभोग केल्यास कन्या संतति होते, असा समज आहे. या दिवशी स्त्रीला सुशोभित आसनावर बसवीत, ओवाळून औक्षण करत. तिने चांगले दागिने, फुलमाला, (गजरा)इ. परीधान करून आणि नंतर पतीशी मीलन करावे, अशी पद्धत होती.

. . . गर्भाधान संस्कार . . .

१. ‘या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाऊन त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या समागम करावा, असे मंत्राद्वारे शिकविले जात. यामुळे सुप्रजाजनन, कामशक्तीचा योग्य वापर आणि कामाला घातलेला आवर, विटाळात समागम न करणे पासून ते समागमाच्या वेळी आसने आणि उच्च आनंद यांचे मार्गदर्शन केले जाई.

२. भगवंताच्या सृष्टिचक्राला गतिमानता देऊन सतत प्रसूतीचे कार्य करून सृष्टीचे कार्य चालू ठेवणारी ही प्रकृती आहे. त्यात मादीच्या स्वरूपाने कार्य ही सृजनशक्तीची देणगी आहे. मानवप्राण्यात स्त्री प्रजानिर्मितीचे कार्य करते. उत्तम प्रजेची निर्मिती आणि तिचे संगोपन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने सोळा संस्कारांत गर्भदानाला फार महत्त्व होते. एके काळी सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या अगोदर पिंडशुद्धी होणे आवश्यक असे; कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते, अशी मान्यता होती.. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी ।’ 

१. `भागवतात आठव्या स्कंधात ‘पयोव्रत’ सांगितले आहे. त्याचे तात्पर्य असे की, मुलाला जन्म देण्याच्या दृष्टीने संयमित जीवन, सात्त्विक आहार आणि भोगविमुक्त विचार या गोष्टी सांभाळून रहाणाऱ्या दांपत्याच्या पोटी तेजस्वी संतती जन्म घेते. अदितीने हे पयोव्रत केले होते; म्हणून तिच्या पोटी वामन अवतार झाला. स्त्री हीच राष्ट्राची जननी आहे. तिने या संदर्भात जास्त जागृत रहावे, यासाठी गर्भाधान संस्कार होता.’

२. बीज अन् गर्भ या संदर्भातील दोष नाहीसे करणे आणि क्षेत्र (गर्भाशय) शुद्ध करणे.

एकूण शारीरिक आणि मानसिक त्रासांपैकी २ टक्के त्रास बीजगर्भदोषांमुळे होतात. त्यांतील अर्धे त्रास शारीरिक आणि अर्धे मानसिक स्वरूपाचे असतात. बीजगर्भदोषाचा परिणाम किती टक्के व्यक्तींत कधी दिसून येतो, हे पुढील सारणीवरून लक्षात येईल.

‘बीजगर्भदोषांचा परिणाम दिसून येण्याचा अवधी परिणाम होणार्‍या

व्यक्तींचे प्रमाण (टक्के)

बीजगर्भदोषांचा

परिणाम दिसून येण्याचा अवधी

परिणाम होणार्‍या

व्यक्तींचे प्रमाण (टक्के)

गर्भधारणा ते १ महिना ७५ ७ ते ८ महिने
१ ते २ महिने ८ ते ९ महिने
२ ते ३ महिने जन्म ते १ वर्ष
३ ते ४ महिने १ ते ५ वर्षे
४ ते ५ महिने ५ ते १० वर्षे
५ ते ६ महिने १० ते २० वर्षे
६ ते ७ महिने पुढे
एकूण १००’

३. या संस्काराने उत्पन्न झालेल्या पुत्रामध्ये ब्रह्मविद्या प्राप्त करण्याची क्षमता असते, असे सांगितले जाते..

४. ‘गार्भैर्होमैर्जातकर्मचौडमौञ्जीनिबन्धनैः ।

बैजिकं र्गािभकं चैनं द्विजानाम् अपमृज्यते ॥

मनुस्मृति, अध्याय २, श्लोक २७

अर्थ : गर्भाधान, जातकर्म, चूडाकर्म आणि मौंजीबंधन या संस्कारांमुळे द्विजांच्या बैजिक (बीजामुळे उत्पन्न झालेले दोष) आणि गार्भिक (गर्भावस्थेतील दोष) दोषांचे परिमार्जन होते, असे मानले जाई.

गर्भाधानसंस्कार न केल्यास काय रतिसुख प्राप्त होणार नाही की संतती होणार नाही ? संतती होईल; पण ती अत्यंत हीन, रुग्ण आणि निकृष्ट होईल.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी 

. . . गर्भाधान संस्कार . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . गर्भाधान संस्कार . . .

Previous post मांगी – तुंगी
Next post बॅंग-बॅंग क्लब